Author - manoj

Festivals of India/ गुढी पाडवा

नमस्कार मंडळी,

आपल्या संस्कृतीत सणाला फार महत्व आहे, त काही नव्याने सांगायची गरज नाही. कुठलाही सण

असू देत, मग तो गणेशोत्सव असो, दसरा असो, दिवाळी असो वा गुढी पाडवा … इतर सर्व कामे बाजूला

ठेवून आपण सहकुटुंब सण साजरा करतोच करतो. विविध खाद्यपदार्थ आणि विशिष्ठ पोशाख हे ह्या

दिवसांच प्रमुख वैशिष्ठ्य. येत्या ८ एप्रिलला साडेतीन मुहुर्तांमधील एक असा हिंदु नववर्षाचा म्हणजेच

गुढीपाडव्याचा सण आहे. आणि सण म्हंटले की सर्वात जास्त नटण्याचा मान जातो तो अर्थातच

स्त्रियांना. मग ती स्त्री खेड्यातली असो किंवा शहरातली, शेतात काम करणारी असो वा एखाद्या कंपनीत

काम करणारी, रंगीबेरंगी व विविध प्रकारच्या साड्या नेसण्याचा मोह कुठल्याच स्त्री ला आवारात नाही.

त्यात “पैठणी” हा शब्द जरी उच्चारला तरी “अय्या” अथवा “अहा” हे शब्द तोंडातून बाहेर पडल्याशिवाय

रहातच नाहीत. कोणालाही वेड करेल अशी ही साडी. विविध रंग, कलाकुसर… काठ बघावा की पदर, रंग

बघावा की नक्षीकाम…अस प्रश्न डोळ्यानाही पडतो. ह्या साडीची भुरळ “होम मिनिस्टर” ना ही पडली,

एवढच काय “British Airways” नी आपल्या एका विमानाच्या शेपटीवर सुद्धा पैठणीच चित्रे काढलय.

तर अश्या ह्या पैठणीच्या संगे आपला “गुढी-पाडवा” साजरा करा…. बांगडी मोर, कळी चंद्रकला, रघु,

शिरोदक …आपली पैठणी निवडा.

हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचे, समाधानाचे, भरभराटीचे आणि उत्तम आरोग्याचे जावो हीच प्रार्थना….